बॅटने मारहाण करणारा खोक्या भोसले निर्दोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेबलवर नोटांची बंडले ठेवून रील बनवणारा, वन्यजीव शिकारीचा गुन्हा दाखल असलेला आणि एका जणाला बॅटने अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या बीड येथील सतीश ऊर्फ खोक्या भोसले याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहातून बाहेर येताच खोक्याचे जंगी स्वागत करण्यात आले. बीडकडे रवाना होतानाची रीलही त्याने बनवली. हा खोक्या भोसले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान पेटवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे.

गेल्या वर्षी 6 मार्च रोजी भाजपचा कार्यकर्ता असलेल्या सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा एका व्यक्तीच्या तळपायावर अमानुषपणे बॅटने मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी खोक्याच्या दहशतीपोटी तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वतःच फिर्याद दिली होती.