
दक्षिण मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात ‘फिरते कायदेशीर मदत केंद्र’ सुरू होत आहे. देशात पहिल्यांदाच अशा कायदेशीर मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ‘दर्द से हमदर्द तक’ संस्था व मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे पेंद्र कार्यान्वित केले जात आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनंत देशमुख, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव, ‘दर्द से हमदर्द तक’ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश साळशिंगीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. या माध्यमातून पैद्यांच्या नातेवाईकांना कायदेशीर मदतीबाबत विनामूल्य मार्गदर्शन केले जाणार आहे.