‘मनबाधा’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत डिंगणकर यांच्या ‘मनबाधा’ पुस्तकाचे प्रकाशन प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीतील लघु नाट्यगृहात सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते झाले. ‘‘हे पुस्तक एका साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे,’’ असे गौरवोद्गार या वेळी शेलार यांनी काढले.

स्वामीराज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या सोहळ्याला लेखक प्रवीण दवणे, अशोक नायगावकर, डॉ. महेश केळुसकर, गझलनवाझ भीमराव पांचाळे, प्रा. नरेंद्र पाठक, रजनीश राणे, प्रफुल्ल मारपकवार, संजय कृष्णाजी पाटील, डॉ. विणा सानेकर उपस्थित होते.

100वे साहित्य संमेलन मुंबईत व्हावे

100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी मुंबईत व्हावे, अशी अपेक्षा या वेळी महेश केळुसकर यांनी व्यक्त केली. प्रवीण दवणे यांनी लेखकाची ही एक वेगळी शोधयात्रा असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.