
शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने महिनाभर रंगणाऱ्या खेळ महोत्सवाच्या फुटबॉल स्पर्धेत मॅक्सी बॉईज संघाने सुपर नोव्हाज संघाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. तसेच महिलांच्या गटात इंडिया रशने टोटल फुटबॉल अॅपॅडमीचा पराभव करत बाजी मारली. तर 7 वर्षांखालील गटात संकल्पने स्पोर्टस् पर्ह्टला तर 9 वर्षाखालील गटात रायझिंग स्टारने सॉक्सर क्लब द मुंबईला नमवत या संघांनी जेतेपदाला गवसणी घातली.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील संघांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत स्थानिक खेळाडूंचा अभूतपूर्व सहभाग लाभला. फुटबॉल क्षेत्रात संधी मिळावी आणि त्यांची गुणवत्ता व आत्मविश्वास वाढावा यासाठी खासदार देसाई यांच्या संकल्पनेतून या विविध गटांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 7 वर्षाखालील आणि 9 वयोगटांसाठी विशेष गटविभागणी करण्यात आली होती. तसेच महिला आणि पुरुषांचीही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व गटातील विजेत्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच तब्बल सवा लाखाच्या रोख पुरस्कारांचा विजेत्यांवर वर्षाव करण्यात आला.
सर्व फुटबॉलप्रेमी खेळाडू आणि प्रेक्षकांनी तरुणांना या खेळ महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक खासदार अनिल देसाई यांचे मनापासून आभार मानले. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, उपनेते सुबोध आचार्य, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, सुरेश लांडगे, उपविभागप्रमुख प्रशांत म्हात्रे, किरण लोहार, माजी नगरसेविका अंजली नाईक, निधी शिंदे, समाजसेविका सुप्रीत चव्हाण, शाखाप्रमुख गणेश पाटील, अविनाश शेवाळे, राजेश दौंडकर, सचिन भोसले, किरण म्हात्रे, विजय भोईर, मनोहर नायडू, अशोक वीर, शाखा समन्वयक विकास भोसले, सिनेट सदस्य स्नेहा गवळी, युवासेना समन्वयक किरण जेधे, विभाग अधिकारी वैभव जाधव, दीपेश चव्हाण, विधानसभा संघटक निमिष भोसले, संजय नटे, महिला शाखा संघटक दुर्गा ढगे, माजी नगरसेवक श्रीकांत शेटये, पदाधिकारी संदीप भोईर, रजनी रमण, मनोज धोत्रे, जयवंत खरात, सुनील मोहळकर, रेणुका टोपकर, अजय कदम, भरत शिंदे उपस्थित होते.