
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे मुंबईकर प्रवाशांचे आज प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेवर हा ब्लॉक ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत घेण्यात आला कल्याणहून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 या वेळेत सुटणाऱया अप जलद आणि अर्ध-जलद सेवा कल्याण आणि ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर या गाडय़ांना थांबा देण्यात आल्याने स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. सीएसएमटी आणि दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात आल्याने लोकलगाडय़ांचे वेळापत्रक आणखीनच कोलमडले.


























































