
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीतील महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले दुचाकीवर स्टंट करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार करीत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी महाविद्यालय परिसरात दुचाकी घेऊन येणाऱ्या मुलांच्या पालकांना दणका देत 25 वाहनचालकांकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, विकास सरोदे, अमोल दांडगे, विकास पाटील, हनुमंत गिरमकर, महिला पोलीस हवालदार उज्ज्वला गायकवाड, किरण निकम यांनी ही कारवाई केली. साहेबराव शंकरराव ढमढेरे (तळेगाव ढमढेरे) महाविद्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली.
वाहनचालकांकडून पोलिसांनी तब्बल 25 दुचाकी ताब्यात घेऊन 25 50 हजार रुपये दंड वसूल करून 15 हजार रुपयांचा दंड वाहनांवर ऑनलाइन पद्धतीने टाकला आहे. या कारवाईमुळे रोडरोमिओ वाहनचालकांनी धसका घेतला आहे. लवकरच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्कश आवाजांच्या बुलेटवर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी सांगितले.
मुलांना शाळेत पाठवायचे कस?
■ आमची मुले वाड्या-वस्त्यांवरुन शाळेसाठी येत असतात. आमच्या येथे एस टी अथवा वाहनांची सोय नाही त्यामुळे मुले मोटारसायकलहून येतात. मात्र पोलिसांनी कारवाई केल्यास मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे