
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱयावर 2021 ते 2025 या पाच वर्षांत तब्बल 362 कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची माहिती राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. 2025 या एका वर्षात मोदींच्या पाच देशांच्या दौऱयावर तब्बल 67 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला. या कालावधीत मोदींनी अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांचा दौरा केला होता.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दौऱयांवरील खर्चाचा तपशील जाहीर केला. या सर्व दौऱ्यांमध्ये फ्रान्सचा दौरा सर्वाधिक महागडा ठरला. या दौऱयासाठी 25 कोटींहून अधिक खर्च आला, तर अमेरिकेच्या दौऱयावर 16 कोटींहून अधिक खर्च झाला. 2024 मध्ये रशिया आणि युव्रेनसह 16 देशांना दिलेल्या भेटीसाठी 109 कोटी खर्च झाले.