
कधीतरी हातात अचानक जास्त रक्कम येते. त्यावेळी कर्ज फेडू की गुंतवणूक करू असा प्रश्न पडतो. अशावेळी योग्य विचार करून आर्थिक निर्णय घ्यावा.
क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज यावर 18 टक्क्यांपर्यंत व्याज लागते. हे व्याज वाचवणे, हाच सर्वांत मोठा परतावा आहे. त्यामुळे ही महागडी कर्जे आधी फेडा.
गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्जावर टॅक्स बेनिफिट मिळत असल्याने तिथे विचारपूर्वक निर्णय घ्या. कर्जाचे प्रीपेमेंट केल्यास व्याजात खात्रीशीर बचत होते.
तुम्हाला मार्केटमधील चढ-उतारांची भीती वाटत असेल तर कर्ज फेडणे हाच उत्तम पर्याय आहे. गृहकर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत केलेली परतफेड व्याजात मोठी बचत करते.
तुमच्याकडे असलेल्या रकमेचे दोन भाग करा. एक भाग महागडय़ा कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि दुसरा भाग चांगल्या योजनेत गुंतवा.
























































