Mumbai Local Update- मध्य रेल्वेच्या फास्ट लोकलची रेड्याला धडक, जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंब्राच्या रेल्वे ट्रॅकवर धावणाऱ्या कल्याण फास्ट लोकलची एका रेड्याला धडक बसली. फास्ट लोकल असल्यामुळे तिचा वेग जास्त होता. त्यामुळे या लोकलच्या धडकेत या रेड्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली आहे. तसेच हा ट्रॅक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने सर्व वाहतूक डाऊन धीम्या मार्गावार वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.