
पश्चिम उपनगरातील ड्रग्ज पेडलर्सना वेगवेगळ्या प्रकराचे ड्रग्ज सप्लाय करणारा माफिया गजाआड झाला. अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
धारावीत राहणारा ड्रग्ज तस्कर समीर शेख याला वांद्रे युनिटने सांताक्रुझ येथे पकडून त्यांच्याकडून 287 ग्रॅम वजनाचा व 86 लाख 20 हजार किमतीचा एमडी साठा जप्त केला होता. समीरने हे ड्रग्ज कोणाकडून घेतले याची चौकशी करीत असताना मोहम्मद आदिल सिद्दिकी या ड्रग्ज सप्लायरचे नाव पुढे आले. मग पथकाने कसून शोध घेत सिद्दिकीच्या मुसक्या आवळल्या.

























































