
मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड म्हणून ओळखले जाणारे अनेक ख्यातनाम चित्रपट आहेत. तरुणाईच्या मनाचा ठाव घेणारा मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट अनेक कारणांनी प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील आवडती जोडी गौरी आणि गौतम म्हणजेच मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी आणि त्यांची कमाल केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या दोघांचा सुपरहिट सिनेमा ‘मुंबई पुणे मुंबईला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. काही सिनेमे मनात घर करून करून राहतात आणि त्यापैकीच एक हा सिनेमा. या सिनेमाचे तिन भाग प्रेक्षक आजही त्याच आवडीने पाहतात. त्यामुळेच आता चौथा भाग कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. येत्या काहीच दिवसांमध्ये या चित्रपटाचा चौथा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सोशल मीडियावर मुंबई पुणे मुंबई 4 च्या घोषणेचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ’15 वर्षांपूर्वी सुरु झाला एक रोमँटिक प्रवास’, ‘नात्यांची गोडवा वाढवायला पुन्हा येतोय’ अशा टॅगलाईनसह ‘मुंबई पुणे मुंबई 4’ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता गौरी- गौतम यांच्या आयुष्याची पुढील कहाणी कशी असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
मुंबई पुणे मुंबई 4 या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे कऱणार असून या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संजय छाब्रिया आणि अमित भानुशाली यांना सोपवण्यात आलीय. नुकताच दिवाळीत सतिश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपट रिलिज झाला. याच चित्रपटासोबत त्यांनी ‘मुंबई पुणे मुंबई ४’ची घोषणा करणारा व्हिडीओ शेअर केला. आता लवकरच या सिनेमाचे दिग्दर्शक ‘मुंबई पुणे मुंबई 4’ची अधिकृत घोषणा करतील.


























































