
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल- थानी यांचे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर अमीर आणि मोदी यांच्यात द्वीपक्षीय चर्चा झाली. बैठकीनंतर मोदींनी एक्सवरून पोस्ट करत आज माझे बंधू अमीर यांच्याशी बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये द्वीपक्षीय धोरणात्मक भागीदारी करार झाला, अशी माहिती दिली. हैदराबाद हाऊस येथे ही बैठक झाली.
नव्याने स्थापित झालेल्या धोरणात्मक भागीदारी कराराच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, ऊर्जा, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यांसह सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे यावेळी दोन्ही देशांनी मान्य केले. त्याचबरोबर दुहेरी कर टाळण्याच्या करारावरही स्वाक्षऱया करण्यात आल्या. अल-थानी यांच्या नेतृत्वाखाली कतारने प्रगतीची नवी उंची गाठली आहे. ते हिंदुस्थान आणि कतारमधील मजबूत मैत्रीसाठी वचनबद्ध आहेत. ही भेट आणखी खास असून आमचे संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढल्याचे मोदींनी म्हटले आहे.