
लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 98 वा ॲकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars 2026) मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अनेक हॉलिवूड- बॉलीवूड़च्या कलाकारांनी आपल्या अनोख्या शैलित ऑस्करचे रेड कार्पेट गाजवलं. बॉलीवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्ये आपलं ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जवळपास नऊ वर्षांनंतर प्रियांकाने ऑस्करच्या मंचावर पुनरागमन केल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
प्रियंका चौप्राने या सोहळ्यासाठी ‘डिओर’ (Dior) फॅशन हाऊसचा पांढऱ्या रंगाचा ‘कस्टम गाऊन’ परिधान केला होता. या ड्रेसचा आकर्षक ‘थाय-स्लिट’ कट आणि त्यावर असलेले फेदर नक्षीकाम तिला अधिक ग्लॅमरस लूक देत होते.
या खास लूकसाठी प्रियांकाने हिऱ्यांचा नेकलेस आणि मॅचिंग कानातले परिधान करूव लूक पूर्ण केला होता. प्रियांका यावर्षी ऑस्कर सोहळ्यात एक महत्त्वाची पुरस्कार सादरकर्ती (Presenter) म्हणून सहभागी झाली आहे. ज्यामुळे हिंदुस्थानी चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला.
View this post on Instagram
प्रियांकाचा नवरा प्रसिद्ध गायक निक जोनास यानेही या सोहळ्याला हजेरी लावली होती. निकने क्लासिक ब्लॅक आणि व्हाईट बो-टाय सूट परिधान केला होता. रेड कार्पेटवर वावरताना या जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे, निकने मनगटावर बांधलेल्या हिंदू धर्मातील पवित्र लाल धाग्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
प्रियांका चोप्राने यापूर्वी 2016 आणि 2017 मध्येही ऑस्कर रेड कार्पेटवर पांढऱ्या रंगाचेच गाऊन परिधान केले होते. यंदाही पांढऱ्या रंगाची निवड करून तिने आपला हा ‘लकी कलर’ कायम ठेवल्याचे दिसून येते. सध्या प्रियांका आपल्या आगामी ‘द ब्लफ’ (The Bluff) या चित्रपटामुळे चर्चेत असून, ऑस्करमधील तिच्या या उपस्थितीने जागतिक मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा तिचे वर्चस्व सिद्ध केले आहे.































































