हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस! संजय शिरसाटांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांचा ‘ट्विट बॉम्ब’

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. व्हिडिओमध्ये संजय शिरसाट यांच्या बाजूला पैशांच्या नोटांची बंडलं ठेवलेली बॅग दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हा रोमांचक व्हिडिओ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बघितला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच देशात हे काय चालले आहे? महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा हा व्हिडिओ अतिशय बोलका आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मला मुख्यमंत्री करा, संपूर्ण गटासह भाजपात विलिन व्हायला तयार! मिंध्यांच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं? संजय राऊतांनी केलं उघड

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते!”

संजय राऊत यांनी दोन ट्विट केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस!, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

गुरूपौर्णिमेनिमित्त दिल्लीत शहांचे चरण धुवून शिदेंनी आशीर्वाद घेतले, मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांत चर्चा! – संजय राऊत