शिवसैनिकांची गॅस एजन्सी कार्यालयांवर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युद्धामुळे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे विधानसभा संघटक प्रमोद चौंडकर, कार्यालय चिटणीस रमेश सावंत यांनी शिवसेना नेते व ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपरमधील सर्व गॅस एजन्सी कार्यालयांवर धडक दिली. गॅस सिलिंडरचे वितरण नियमबद्ध व प्रामाणिक पद्धतीने करण्यात यावे, कोणताही काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्यावी, कोणताही गैरप्रकार आढळताच कक्षातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एजन्सी व्यवस्थापनाला देण्यात आला. कक्षाचे राज्य कार्यकारिणी सचिव निखिल सावंत, अशोक शेंडे, राजेश कुचिक यांच्या सूचनेनुसार व उत्तर पूर्व मुंबई लोकसभा समन्वयक अजय शिरोडकर, ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 चे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली.