वरळीत शिवसेनेचे भव्य रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना वरळी शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी वरळी शाखेच्या वतीने दरमहा 17 तारखेला या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या 17 मार्च रोजी 159 वे रक्तदान शिबीर पार पडणार असून नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी नाका येथील शिवसेना शाखेत दरमहा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिवसेनाप्रमुखांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाल्यानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी दर महिन्याच्या 17 तारखेला हे रक्तदान शिबिराचे पार पडते. त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी 17 मार्च रोजी वरळी नाका येथील शिवसेना शाखा येथे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन अरविंद भोसले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9821581860.