
मुक्या प्राण्यासोबत तळमळीने संवाद साधणाऱया चिमुकलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शाळेत जायला निघालेल्या एका लहान मुलीचा आहे. तिच्या घराबाहेर एक काळा बैल शांतपणे बसला आहे. चिमुरडी बैलाजवळ थांबते. त्याच्याकडे प्रेमाने पाहते आणि म्हणते की, मी शाळेतून घरी आल्यावर तुला काहीतरी घेऊन येईन. तू इथेच थांब नाहीतर ताई मारेल. नंतर ती त्याच्या शिंगांना हलकेच स्पर्श करते, जणू ती त्याला आशीर्वाद देत आहे. आणि नंतर त्याला हात हलवून म्हणते, ‘बाय’ ! तो बैलही तिच्याकडे शांत भावनेने पाहतो- जणू काही त्यालाही त्या निष्पाप बोलांचा अर्थ समजला असेल. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात शेअर होत आहे.




























































