हे करून पहा – उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तापमानाने उच्चांक गाठला आहे. कडक ऊन्हामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होऊन त्वचा कोरडी पडते. उष्णता, घाम, एअर पंडिशनिंग आणि सूर्यप्रकाश हे सर्व घटक त्वचेच्या नैसर्गिक मॉइश्चर परिणाम करतात.

योग्य आहार, पुरेसे पाणी आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण केले तर त्वचा तजेलदार राहू शकते. सनस्क्रीन व ग्लिसरीनयुक्त मॉइश्चरायझर लावा. गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने आंघोळ करा.

साबण टाळा, त्याऐवजी सौम्य आणि हायड्रेटिंग क्लेन्सर वापरा. काकडी, कोरफड किंवा जेल मास्क वापरल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.