तीन वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार स्वायत्तता, बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर ज. जी. समूह रुग्णालये तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि  रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.

समितीत टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे, के.ई.एम. रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. संजय ओक, ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, बी.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.