
सर्वत्र घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत असताना स्वयंपाक करताना गॅस बचतीचे फंडे अमलात आणले पाहिजेत. स्वयंपाकासाठी नेहमी गरजेनुसार पाण्याचे योग्य प्रमाण वापरावे, जास्तीचे पाणी उकळण्यासाठी गॅस विनाकारण खर्च होतो.
प्रेशर कुकरचा वापर करा. मंद आचेवर स्वयंपाक करा. गॅस पेटवण्यापूर्वी स्वयंपाकासाठी सर्व तयारी म्हणजे भाजी चिरणे, सोलणे किंवा मसाले तयार करणे पूर्ण करा. फ्रीजमधील दूध बाहेर काढल्याबरोबर लगेच गॅसवर गरम करू नका.

























































