हिंदुस्थानशी तणाव वाढला असताना तुर्कीचे पाकिस्तानला बळ, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करार

पहलगाम दहशतवादी हल्ला व ‘सिंदूर ऑपरेशन’नंतर हिंदुस्थानशी तणाव वाढला असताना तुर्कीने पाकिस्तानला बळ दिले आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण, व्यापार, ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्याचा करार झाला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील व्यापार 5 अब्ज डॉलरवर जाणार आहे.

तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकन फिदान व संरक्षणमंत्री यासर गुलेर आणि पाकचे परराष्टमंत्री इसहाक डार यांच्यात झालेल्या बैठकीत द्विपक्षीय करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तुर्की हा आमचा विश्वासू मित्र आहे. संरक्षण क्षेत्रातील तुकाaचा अनुभव व कौशल्याचा पाकिस्तानला फायदा होईल. असे डार म्हणाले.

हिंदुस्थानला सावध राहावे लागेल!

आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीने नेहमीच हिंदुस्थानच्या विरोधात भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. कश्मीरच्या मुद्दय़ावरही तुकाaने कायमच पाकिस्तानची बाजू घेतली आहे.  तुर्कीने ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईचा निषेध केला होता. हिंदुस्थानच्या या कारवाईमुळे मोठे युद्ध भडकू शकते, असे तुकाaने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर तुर्की व पाकच्या वाढत्या जवळिकीमुळे हिंदुस्थानला सावध राहावे लागणार आहे.