विल्यम डॅलरिम्पल यांच्या ‘गोल्डन रोड’ला मानाचा पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विल्यम डॅलरिम्पल हे स्कॉटिश इतिहासकार, लेखक आणि ब्रॉडकास्टर. भारत आणि ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासावरील संशोधनासाठी ते ओळखले जातात. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या जागतिक प्रभावासंदर्भात त्यांचे लेखन भाष्य करते. ऐतिहासिक लेखन आणि प्रवास साहित्यातील योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळालेल्या विल्यम यांना प्रतिष्ठित मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज 2026 पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द गोल्डन रोडः हाऊ एन्शियंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड’ या पुस्तकाला हा जाहीर झाला आहे. प्राचीन भारताचा जागतिक संस्कृतीवर कसा व्यापक प्रभाव पडला होता यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक कायम लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत असते. जागतिक इतिहासात प्रचलित असलेली ‘सिल्क रोड’ ही संकल्पना. याच धर्तीवर, भारतातून सुरू झालेला सागरी व्यापार आणि त्या माध्यमातून झालेली सांस्कृतिक देवाणघेवाण याला ‘गोल्डन रोड’ असे संबोधत भारतीय संस्कृतीचा सर्व परिप्रेक्ष्यातून वेध घेणारे हे पुस्तक वाचायलाच हवे.