समुद्राच्या लाटांपासून मिळणार वीज,लक्षद्वीपमध्ये उभा राहतोय जगातील पहिला हायब्रिड प्रकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्राने वेढलेल्या बेटांपुढे पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि ऊर्जेचा तुटवडा ही मोठी समस्या असते. या पार्श्वभूमीवर लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती येथे समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करणारा आणि वीजनिर्मिती करणारा अत्याधुनिक प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो जगातील पहिला ओटीईसी (ओशन थर्मल एनर्जी कनव्हर्जन) आधारित हायब्रिड प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पातून दररोज मोठय़ा प्रमाणात शुद्ध पाणी आणि 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन

टेक्नॉलॉजीने (एनआयओटी) भूशास्त्र मंत्रालयांतर्गत सुरू केला आहे. या तंत्रज्ञानात समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाणी आणि खोल समुद्रातील थंड पाणी यांचा वापर करून वीज आणि पिण्याचे पाणी तयार केले जाते. या प्रक्रियेत गरम पाणी व्हॅक्युममध्ये नेऊन वाफ तयार केली जाते.

1,000 मीटर खोल समुद्रातून थंड पाणी

 समुद्राच्या तळापासून थंड पाणी वर आणणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाच टप्पा आहे. यासाठी वैज्ञानिकांची टीम सुमारे 3.8 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बसवत आहेत. 900 मि.मी. व्यासाची हायडेंसिटी पॉलिथिलीन पाईपलाईन समुद्राच्या तळाशी जाऊन सुमारे 1,000 मीटर खोलीतील बर्फासारखे थंड पाणी वर आणेल.