उन्हाळ्यात अंजीर खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू होताच आपल्या आहारात बदल करणे खूप आवश्यक असते. उन्हाळ्यात शरीरातील पाणी लवकर कमी होते. पचनक्रिया देखील संवेदनशील होते. ज्यामुळे पोटदुखीचा धोका वाढतो. बऱ्याचदा लोक उष्ण प्रकृतीचे पदार्थ, ज्यामध्ये सुकामेवा देखील समाविष्ट आहे. अनेकदा आपण सुकामेवा खाणे टाळतो. विशेषतः अंजीरबद्दल अनेकांना प्रश्न पडतो की उन्हाळ्यात अंजार खाणे फायदेशीर आहे का? अंजीर हे पोषक तत्वांनी समृद्ध असलेले एक सुके फळ असून ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तथापि, त्याच्या उष्ण स्वभावामुळे लोक उन्हाळ्यात ते खाणे टाळतात. मात्र उन्हाळ्यात अंजीर खावे कि नाहि किंवा उन्हाळ्यात अंजीर खाल्ल्याने कोणते फायदे होतात जाणुन घऊया.

अंजीर पोषक तत्वांचा खजिना आहेत. त्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच ते लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा देखील एक चांगला स्रोत आहेत. ते खाल्ल्याने केवळ पोट जास्त वेळ भरलेले राहत नाही, तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. चला तर मग, उन्हाळ्यात अंजीरचे सेवन कसे करावे हे जाणून घेऊया.

उन्हाळ्यात अंजीर खाणे किती योग्य आहे?
अंजीरचा गुणधर्म उष्ण असला तरी, उन्हाळ्यात त्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तुम्ही ते कच्चे खाऊ शकता, परंतु उन्हाळ्यात सेवन करण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवल्याने अंजिराचा उष्ण स्वभाव बदलतो आणि शरीराला लाभ देतो.

अंजीर खाण्याचे फायदे

वजन नियंत्रित राहते
अंजीरचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात लक्षणीय मदत होऊ शकते. त्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि खाण्याची तीव्र इच्छा नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

शरीरात ऊर्जा वाढवते
उन्हाळ्यात सुस्ती येणे सामान्य आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो. दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळू शकते. अंजीरमधील नैसर्गिक साखर, खनिजे आणि बी जीवनसत्त्वे त्वरित शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात.

त्वचेसाठीही फायदेशीर
अंजीर खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी व ई असतात, जे त्वचेसाठी आवश्यक पोषक घटक आहेत. ते खाल्ल्याने त्वचेला चमक येते, कोरडेपणा कमी होतो आणि सूर्या पासून होणाऱ्या हानीपासून त्वचेचे संरक्षण होते.

हृदयाचे आरोग्य सुधारते
अंजीरमध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देतात. ते कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाबही नियंत्रित ठेवतात.