बलात्कारी माणसाला हार घालतात, हीच का भाजपची संस्कृती? अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल

उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी व भाजपचे माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचे हार घालून जल्लोषात स्वागत केले. त्याच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते तिहार तुरुंगाबाहेर उपस्थित होते.

यावरून सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. दमानिया यांनी सेंगारच्या स्वागताचा फोटो ट्विट करत सोबत ”निर्लज्जपणा… एका बलात्कारी माणसाला हार घालतात? ही भाजपची संस्कृती?”, असा संतप्त सवाल केला आहे.

उन्नाव येथे 4 जून 2017 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर तिच्या वडिलांचा कोठडीत मृत्यू झाला. 13 एप्रिल 2018 ला भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक करण्यात आली आणि सीबीआयकडून चौकशी झाली. त्यानंतर कारच्या अपघातात संशयास्पदरीत्या तिच्या दोन नातेवाइकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी आणि भाजपातून हकालपट्टी झालेला आमदार कुलदीपसिंग सेंगरला दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने 20 डिसेंबर 2019 रोजी बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण आणि पोक्सोअंतर्गत विविध कलमान्वये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. तसेच कनिष्ठ न्यायालयाने त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली