
सरकारी नोकरीची वाट पाहणाऱया तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेत स्थानिक अधिकारी पदांची सध्या भरती सुरू आहे. एकूण 300 जागांसाठी ही भरती सुरू असून यात महाराष्ट्रात 40, गुजरात 15, कर्नाटक 35, तामीळनाडू 160, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यात 50 पदांची भरती केली जाणार आहे. 13 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱया उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांपर्यंत असावे. अधिक माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.