
नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या आणखी एका अधिकाऱ्याची हिंदुस्थानमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे. यानुसार या अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत हिंदुस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन संशयित घटनांमध्ये सामील असल्याच्या कारणावरून केंद्र सरकारने पाकच्या या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे.
हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या एक पत्र पाठवले आहे. कोणताही पाकिस्तानी राजदूत किंवा अधिकारी त्यांच्या विशेषाधिकारांचा आणि पदाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणार नाही याची खात्री करावी, असे पत्रातून हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाला एक प्रकारे फटकारले आहे.
माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी
हिंदुस्थान सरकारने यापूर्वी पाक उच्चायुक्तालयातील अहसान-उर-रहीम उर्फ दानिश याला हेरगिरीत सामील असल्याच्या कारणावरून 13 मे रोजी देश सोडण्याचे आदेश दिले होते. दानिशचे कनेक्शन पाकिस्तान हेर ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राशी होते. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील इफ्तार पार्टीत सामील झाली होती.