
दिवाळीनिमित्त राजस्थानमधील जयपूर येथील त्योहार दुकानाने 24 कॅरेट सोने आणि चांदीने बनवलेली एक आगळीवेगळी मिठाई तयार केली आहे. स्वर्ण भस्म पाक आणि चांदी भस्म पाक असे या मिठाईला नाव देण्यात आले आहे. या मिठाईची किंमत 45 हजार रुपये ते 1 लाख 11 हजार रुपये किलोपर्यंत आहे. सध्या या मिठाईची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.
ही मिठाई सर्वात महागडी असून जयपूरच्या वैशाली नगर येथील दुकानात उपलब्ध आहे. त्यामुळे त्योहार नावाच्या दुकानाचीही जोरदार चर्चा होत आहे. चार्टर्ड अकाउंट असलेली अंजली जैन यांचे हे दुकान असून त्या आता बिझनेस वूमन बनल्या आहेत. सोने आणि चांदीपासून मिठाई बनवण्याची कल्पना त्यांना आयुर्वेदाच्या पारंपारिक रेसिपी मधून आल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशातील सर्वात महागडी मिठाई स्वर्ण प्रसादम आहे. याची किंमत 1 लाख 11 हजार रुपये प्रति किलो आहे. ही दिसायला खूपच जबरदस्त आहे. याची पॅकेजिंग सुद्धा खास आहे. याला ज्वेलरी बॉक्समध्ये पॅक केले जाते. याला बनवण्यासाठी महागडया ड्रायफ्रूट्स चा वापर केला जातो. यामध्ये खायचे ओरिजनल सोने टाकले आहे. याला सोन्याचे भस्मही म्हटले जाते. 24 कॅरेट गोल्डने बनवण्यात आलेल्या मिठाईला स्वर्ण प्रसादम नाव दिले आहे.
View this post on Instagram