
इलेक्ट्रिक दुचाकी पंपनी ओलाचे महाराष्ट्रातील 121 स्टोअर्स बंद करण्यात येणार आहेत. ओलाच्या स्टोअर्सकडे ट्रेड प्रमाणपत्र नसल्याने वाहतूक विभागाने स्थानिक आरटीओला स्टोअर्स बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मागील महिन्यात आरटीओने महाराष्ट्रातील ओलाच्या अनेक स्टोअर्सवर छापेमारी केली होती. ओलाच्या दुकानात व्यापार प्रमाणपत्र नसल्याने दुकानातील 192 वाहने आरटीओने जप्त केली होती. तसेच पंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ओलाच्या देशभरातील स्टोअर्सवर आरटीओने कारवाई केली आहे.