9 मिनिटांच्या एसी प्रवासासाठी 1255 रुपये मोजा

देशातील सर्वात लहान रेल्वेमार्ग नागपुरात आहे. नागपूर ते अजनीदरम्यानचा हा अवघ्या तीन किलोमीटरचा मार्ग आहे. हा प्रवास मोजून नऊ मिनिटांतच संपतो. परंतु 9 मिनिटांच्या एसी प्रवासासाठी प्रवाशांना 1255 रुपये मोजावे लागतात. नागपूर ते अजनी मार्गावर आठ रेल्वे धावतात. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी जनरल डब्यासाठी 60 रुपये तिकीट आहे. स्लीपर क्लासच्या तिकिटाची किंमत 145 ते 175 रुपये आहे. एसी थ्री टायरचे तिकीट रुपये 555, एसी 2 टायरचे तिकीट 760 रुपये,  एसी 1 टायरचे तिकीट रुपये 1255 आहे.

देशातील सर्वात लांब रेल्वे मार्ग

सर्वात लांब रेल्वे मार्ग कन्यापुमारी ते दिब्रुगढ असा आहे. स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीला विवेक एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्यात आली. 4300 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 80 तास म्हणजे चार दिवस लागतात. नऊ राज्यांतून विवेक एक्स्प्रेस ट्रेन धावते. जगातील हा 24 व्या क्रमांकाचा सर्वात लांब रूट आहे.