
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 तर्फे तब्बल 140 महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महिला बचत गटांना विविध शासकीय योजना व उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महिला बचत गटांचा भव्य सन्मान सोहळा व मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, उपनेत्या ज्योती ठाकरे, नगरसेविका श्रद्धा जाधव आणि संपदा मयेकर, मातोश्री बचत गटाच्या उपाध्यक्ष रंजना नेवाळे, जयश्री बळ्ळीकर, माई परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे तसेच युगंधरा साळेकर, पायल ठाकूर, शुभदा कोळी, गायत्री आवळेगावकर, अरुंधती दुधवडकर, पल्लवी सकपाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

























































