
देशातील सर्वात मोठे एअरलाइनचे जाळे असणाऱ्या इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी राजीनामा दिला आहे. एल्बर्स यांचा कार्यभार व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांच्याकडे देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंडिगोला मोठय़ा ऑपरेशनल संकटाला तोंड द्यावे लागले होते. इंडिगो कंपनी नवीन फ्लाइट डय़ुटी टाइम लिमिटेशन नियमांशी वेळेवर जुळवून घेण्यास असमर्थ ठरल्याने 2 हजार 500 हून अधिक उड्डाणे रद्द झाली होती, तर 1 हजार 900 उड्डाणे विलंबाने उडाली. परिणामी सुमारे तीन लाख प्रवासी अडकले होते. या प्रकरणानंतर ‘डीजीसीए’ने इंडिगोवर 22 कोटींचा दंड लावला होता. एल्बर्स यांचा राजीनामा याचाच परिणाम असल्याचे मानले जाते.


























































