
विधानसभा निवडणुकीत मी 20 हजार मतदार बाहेरून आणले त्यामुळे माझा विजय झाला असे विधान मिंधेंचे आमदार विलास भुमरे यांनी केले. त्यांनी हे विधान करताच व्यासपीठावर बसलेले एकनाथ शिंदे यांनी त्यांना हटकले.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मिंधे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पाडला. त्यावेळी आमदार विलाम भुमरे यांनी भाषण केले. त्यावेळी भुमरे म्हणाले की आपण मतदार यादीकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या गावातील, आपल्या मतदारसंघातील किती लोक स्थलांतरित झाले आहे याची माहिती घेतली पाहिजे. विधानसभा निवडणुकीत मी 20 हजार मतदार बाहेरून आणले. त्यामुळे माझा विजय झाला. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना हटकलं. त्यामुळे भुमरे यांना आपलं भाषण थांबवावं लागवं. शिंदेंनी भुमरेंना आपलं वाक्य दुरुस्त करायला सांगितलं. तेव्हा भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले की माझ्या मतदारसंघातले 20 हजार मतदार बाहेर स्थलांतरित झाले होते. त्यांनी मी निवडणुकीच्या वेळी परत आणले, त्यामुळे माझा विजय झाला असे स्पष्टीकरण भुमरे यांनी दिले.