
राज्यातील 201 सहाय्यक निरीक्षकांना अखेर आज गोड बातमी मिळाली. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी करत या 201 सहाय्यक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी बढती देण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्या गेल्या कित्येक महिन्यांपासून लटकलेल्या होत्या. बढती कधी होणार तसेच बदली कधी होणार याकडे अधिकारी नजरा लावून होते. आज बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहाय्यक निरीक्षकांना आनंदाची बातमी मिळाली. 201 सहाय्यक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी बढती देण्याचा आदेश महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आला. यामुळे आता उपनिरीक्षकांनादेखील लवकरच बढती देण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर बदलीसाठी पात्र असलेले अधिकारी बदलीचे आदेश कधी जारी होणार याकडे लक्ष लाऊन बसले आहेत.




























































