
राज्यात देशी गायींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. ती रोखण्यासाठी देशी गायींच्या संवर्धनास प्रोत्साहन देणे गरजचे आहे. त्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्येच सरकारने गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले. परंतु संख्येत वाढ करण्याबरोबरच देशी गायींची प्रजननक्षमता आणि उत्पादनक्षमताही वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी दरवर्षी 22 जुलै हा दिवस राज्यात शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा राज्य शासनाने आज केली. शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करताना पशुसंवर्धन आयुक्त आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाने देशी गाय आणि गायीपासून मिळणाऱया उत्पादनांचे महत्त्व विशद करणारी चर्चासत्रे, प्रदर्शने, शिबिरे आणि स्पर्धांचे संयुक्तरीत्या आयोजन करावे, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.