
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधील मार्गावर 28 स्टील ब्रिज तयार करण्यात येत आहेत. यातील 11 स्टील ब्रिज हे महाराष्ट्रात तर 17 ब्रिज हे गुजरातमध्ये असणार आहेत, परंतु या ब्रिजची निर्मिती या दोन्ही राज्यांना वगळून उत्तर प्रदेशात केली जात आहे.
या स्टीलच्या पहिल्या ब्रिजला या महिनाअखेर लाँच केले जाणार असून ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. सध्या या मार्गावरील काम जोरात सुरू असून गुजरातमध्ये 100-100 मीटर लांबीचे स्टील स्पॅन यशस्वीपणे उतरवले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी एक हायस्पीड रेल कॉरिडोरचे निर्माण केले जात आहे. बुलेट ट्रेन योजनेसाठी 508 किलोमीटर लांब आहे जो मुंबई ते अहमदाबादपर्यंत चालणार आहे. या योजनेचा 352 किलोमीटरचा भाग गुजरातमधील तर 156 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील आहे.
ब्रिजची खास वैशिष्ट्ये
14.3 मीटर रुंद म्हणजेच जवळपास 47 फूट आणि 14.6 मीटर उंच म्हणजेच जवळपास 48 फूट आहे. या स्टील ब्रिजचे वजन जवळपास 1500 मेट्रिक टन आहे. याला उत्तर प्रदेशातील हापूडजवळील सालासर वर्कशॉपमध्ये तयार केले जात आहे. ब्रिजला सी-5 सिस्टम पेटिंगने पेंट केले जात आहे. हे स्टील ब्रिज राजमार्ग, एक्स्प्रेस-वे आणि रेल्वे लाइनला पार करण्यासाठी उपयुक्त असतात. गुजरातमध्ये सहा स्टील ब्रिजचे काम करण्यात आले आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद, साबरमतीतील 12 स्टेशनवर थांबा असेल.