
इराण युद्धामुळे शेअर बाजारात घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे. सेन्सेक्स सुमारे 1,500 अंकांनी तर, निफ्टी जवळपास 500 अंकांनी कोसळला. शेअर बाजरातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून सेन्सेक्स तब्बल 6,723 अंकांनी कोसळला असून गुंतवणूकदारांची तब्बल 33.68 लाख कोटी रुपये आतापर्यंत बुडाले आहेत. सलग तिसऱया दिवशी शेअर बाजाराने गटांगळी खाल्ली. सेन्सेक्स 1,470 अंकांनी कोसळून 74,563.92 वर तर, निफ्टी 488.05 अंकांनी घसरून 23.151.10 अंकांवर बंद झाला. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची सर्वात मोठी घसरण झाली आहे. आता 1 डॉलरची 92.42 पैसे मोजावे लागणार आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पार गेल्या आहेत.


























































