
कुख्यात नक्षलवादी हिडमा याचा खात्मा केल्यानंतर आता छत्तीसगडमध्ये 37 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी 27 जणांवर 65 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण करणाऱया नक्षलवाद्यांमध्ये 12 महिलांचाही समावेश आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिह्यात नक्षलवाद्यांनी बंदुका खाली ठेवल्या. गेल्या दोन वर्षांमध्ये 2,200 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, बस्तर प्रदेशात शांतता आणि प्रगतीच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी सुरू केलेला ‘पुना मार्गेम’ हा पुनर्वसन ते सामाजिक पुनए&कात्मता उपक्रम प्रभावी ठरत आहे. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याची यामुळे संधी मिळत आहे.

























































