डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मध्य रेल्वेच्या 4 विशेष लोकल फेऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री मध्य रेल्वेकडून 4 विशेष लोकल फेऱया चालविण्यात येणार आहेत. मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.30 वाजता विशेष लोकल सुटेल व कल्याण येथे 3 वाजता पोहोचेल. तसेच कल्याण येथून 1.30 वाजता सुटणारी विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री 3 वाजता पोहोचेल. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटणारी विशेष लोकल पनवेल येथे 2.50 वाजता पोहोचेल. पनवेल येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटणारी विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.50 वाजता पोहोचेल. या विशेष फेऱ्यांमुळे चैत्यभूमीला भेट देण्यासाठी विविध भागांतून येणाऱ्या अनुयायांना दिलासा मिळणार आहे.