सध्या तब्बल कोटय़वधी रुपयांच्या आशियानाला मागणी असल्याचे आणि आतापर्यंत झालेल्या घरांच्या व्यवहारात 41 टक्के घरे ही एक कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची असल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱया एका पंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे याबाबतची माहिती पुढे आली आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत ही वाढ 11 टक्क्यांहून अधिक आहे.
84 टक्के घरांची विक्री ही अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांत झाली आहे. हैदराबाद येथे सहा महिन्यांत एक हजार 300 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आलिशान घर खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे चित्र आहे. पुण्यासारख्या शहरात आयटी पंपन्यांमध्ये काम करणाऱयांची संख्या वाढत आहे. गलेलठ्ठ पगार असलेले तरुण कोटय़वधी रुपयांच्या आलिशान घरांसाठी व्यवहार करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षीच्या सहा महिन्यांत यात तब्बल 450 टक्के वाढ होत एक हजार 100 घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे.
दुसरी पसंती वरळीला असून लोअर परळ, प्रभादेवी, वांद्रे, जुहू, ओशिवरा, अंधेरी आणि गोरेगाव येथे आलिशान घरांच्या खरेदीसाठी ग्राहकांची पसंती असल्याचे चित्र आहे. उपनगरात सर्वाधिक 881 कोटी रुपयांचे व्यवहार हे गोरेगाव येथे झाले आहेत.
आलिशान घरांच्या विक्रीत दक्षिण मुंबईत मोठय़ा प्रमाणावर उलाढाल झाली आहे. एकटय़ा दक्षिण मुंबईत 37 टक्के घरांची विक्री झाली आहे.
सरकारची तिजोरीही फुगली
जानेवारी ते जुलै या सहा महिन्यांत मुंबईत एकूण 84,653 मालमत्तांची विक्री झाली. राज्य सरकारला त्यातून 6,929 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षीच्या सहा महिन्यांच्या तुलनेत ही वाढ 16 टक्क्यांनी अधिक आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबई शहरात 12,300 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या घरांचे किमान आकारमान दोन हजार चौरस फूट आणि त्याहून अधिक आहे. 12,300 कोटींपैकी 3,500 कोटींची घरे ही रिसेलमधील तर उर्वरित नव्याकोऱया घरांचा व्यवहार झाला आहे.