भिवंडीतील राड्याप्रकरणी भाजप-कोणार्क गटातील 44 जणांना अटक

भिवंडी महापालिका निवडणुकीच्या रागातून कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर भाजप आमदार महेश चौघुले यांच्या गटाने हल्ला करून दहशत माजवली होती. या राड्याप्रकरणी भाजप आणि कोणार्क गटातील ४४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

भाजप आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित याचा माजी महापौर विलास पाटील यांनी दारुण पराभव केला. याच रागातून रविवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट समोरासमोर भिडले. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला. आज पहाटे पोलिसांनी विलास पाटील गटाच्या ३५ जणांना तर आमदार महेश चौघुले गटातील ८ जणांना अटक केली.