गलवान संघर्षानंतर  जयशंकर पहिल्यांदा चीनमध्ये

गलवान संघर्षानंतर तब्बल 5 वर्षांनी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. गेल्या 5 वर्षात जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. हिंदुस्थान- चीन यांच्यातील संबंध मजबूत करणे, तसेच 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर बिघडलेले संबंध पुन्हा रुळावर आणणे हा या दौऱ्याचा  मुख्य उद्देश आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.