
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात 60 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या दोन महिन्यांच्या अवधीत पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस मुंबई सेंट्रलऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील ट्रॅक नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी हा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांची दोन महिने गैरसोय होणार आहे.
60 दिवसांच्या ब्लॉक काळात अनेक गाडय़ांच्या सेवेत बदल केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. त्यानुसार ट्रेन क्रमांक 22946 ओखा-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 22210 हजरत निजामुद्दीन-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 09086 इंदूर – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 09076 काठगोदाम – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक 09186 कानपूर अन्वरगंज – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा प्रवास दादर स्थानकावर समाप्त केला जाणार आहे.


























































