धक्कादायक! इंदूरमध्ये डिजिटल लॉकमुळे आठ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराला डिजिटल लॉक लावल्यामुळे घराला लागलेल्या आगीत आठ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंदूरमधील स्वर्ण बाग कॉलनीत उघडकीस आली आहे. रबर व्यावसायिक मनोज पुगलिया यांच्या तीन मजली घरात आग लागली, परंतु ऐनवेळी डिजिटल लॉक उघडले नाहीत. त्यामुळे घरातील लोक बाहेर पडू न शकल्याने आठ जणांचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. या घटनेने डिजिटल, स्मार्ट आणि सेन्सर असलेल्या डोर लॉकच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. डिजिटल लॉक हे पिन नंबर, कार्ड, अंगठा, चावी आणि इतर सिस्टिमने उघडतात.