
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. अत्याचारानंतर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये 85 वर्षाची वृद्ध महिला राहत होती. या महिलेच्या पतीचे आणि मुलाचे निधन झाले होते. ही महिला भाऊ, वहिनी आणि सुनेसोबत राहत होती. दुपारी एक वाजता महिलेची सून सासूच्या खोलीत आली तेव्हा आरोपी या वृद्ध महिलेवर बलात्कार करत होता. तेव्हा सुनेने जोरदार आरडाओरड केली, तेव्हा आरोपी पळून गेला. पण या घटनेनंतर पिडीत महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव राकेश असून तो 35 वर्षाचा होता. आरोपी राकेश हा दारूच्या आहारी गेला असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
In a shocking incident in UP’s Bareilly, A 85 yr old Muslim woman suspected of rape & murder. The police sent the body for postmortem. The accused Rakesh Kumar is arrested and further investigation in on. pic.twitter.com/zGr0jfocYp
— Mohammed Zubair (@zoo_bear) July 29, 2024