
नागपुरात धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी पोलिसांनी वेळीच या जोडप्यावर कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चालक दुचाकीवर अश्लिल चाळे करताना एका युगुलाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हर्ष उर्फ बिल्ली कहर असे त्या दुचाकी चालकाचे नाव असून तो कुख्यात गुंड असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी तो दुचाकीच्या पेट्रोल टँकवर बसून प्रेयसी सोबत अश्लील चाळे करत होता. गंभीर बाब म्हणजे पोलीस ठाणाच्या हद्दीत दुचाकीवर फिरत होता. यावेळी परिसरातील इतर नागरिकांनी या युगुलाचा व्हिडीओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली. पोलिसांनी त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला. तसेच त्या युगुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Nagpur News : कारच्या स्टिअरिंगवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे; व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई