
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पाचं वाचन केलं. यामध्ये नऊ क्षेत्रांमध्ये सरकार अधिकाधिक लक्षं देणार असल्याचं त्यांनी पहिलेच सांगितलं. तसेच गरीब, महिला, युवा वर्ग आणि शेतकरी हे या अर्थसंकल्पाच्या केंद्र भागी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी आदिवासींसाठी एक अभियान सुरू केलं जाणार असल्याची घोषणा केली.
पाच कोटी आदिवासींसाठी प्रगत गाव अभियान
आदिवासी समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ‘आदिवासी उन्नत ग्राम अभियान’ सुरू केले जाईल. या योजनेअंतर्गत आदिवासीबहुल गावे आणि आदिवासी जिल्ह्यांतील कुटुंबांसाठी कव्हरेज दिले जाईल. यामुळे 63,000 गावे समाविष्ट होतील, 5 कोटी आदिवासी लोकांना फायदा होईल.