
पुण्यातला कुप्रिसिद्ध गुंड गजा मारणेने इन्स्टावर भाईगिरीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ मारणेला चांगलाच महागात पडला असून पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.
पुण्यातला गुंड गजा मारणे याने आपल्या GM Boys या इन्स्टाग्रामच्या अकांऊटवरून भाईगिरीचे काही व्हिडीओ आणि रील्स पोस्ट केले होते. असे व्हिडीओ पाहून तरुणी गुंडगिरीकडे वळतात असे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी गजा मारणेला पोलिस स्थानकात बोलून चौकशी केली आहे. मारणेचा साथीदार टिपू पठाण हे व्हिडीओ पोस्ट करून हे अकाऊंट चालवतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनीही या पठाणला पोलीस स्थानकात बोलवून चौकशी केली. असे व्हिडीओ न बनवण्याची तंबी पोलिसांनी मारणे आणि पठाणला दिल्याचे समजते.
सोशल मीडिया वापरा..पण जपून, पुणे पोलिसांचे तुमच्यावर लक्ष!
सोशल मीडियावर शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ बनवत असाल तर तुमच्या आगामी रिलमध्ये आम्हाला टॅग करा आणि याचे परिणाम आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आमचे लक्ष तुमच्यावर आहे. #PuneCitySurksha #RealConsequences pic.twitter.com/y6CQySYkat
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) September 14, 2024
काही दिवसांपूर्वी गजा मारणेने मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार केला होता. तर काही महिन्यांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचीही मारणेने भेट घेतली होती.