बार्टीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

बार्टीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन सुरू केले आह. पण आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग का येत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच पीएचडी करून काय दिवे लावणार असे प्रश्न विचारणारे या प्रश्नाकडे लक्ष देतील असे अजित पवारांचे नाव न घेता टोलाही लगावला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, गेल्या आठवड्याभरापासून सारथीचे विद्यार्थी आंदोलन करत असतानाही सरकार मुद्दामहून त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करत आहे. 100 टक्के अधिछात्रवृत्ती मिळावी या मागणीसाठी बार्टीच्या विद्यार्थांनी देखील आंदोलन केले, तेव्हा सरकारने निर्णय घेतला. आता याच मागणीसाठी सारथीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे, उद्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागेल. आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग का येत नाही ? असो, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत का? असा प्रश्न विचारणारे सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या सबंधित प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.