
महायुती सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात 701 कोटी रुपये मिळाली अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार केली आहे. तसेच प्रसिद्धीसाठी महायुतीचा एकच मंत्र घोषणा मोठ्या, काम कमी हेच तंत्र असेही वडेट्टीवार म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून वडेट्टीवार म्हणाले की, “प्रसिद्धीसाठी महायुतीचा एकच मंत्र घोषणा मोठ्या, काम कमी हेच तंत्र ” मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सव निमित्त गेल्यावर्षी महायुती सरकारने वाजत गाजत कॅबिनेट बैठक घेतली. जोरदार पत्रकार परिषद घेऊन मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी ४५ हजार कोटींची घोषणा केली होती.पण
घोषणा होऊन एक वर्ष झाले पण मराठवाड्याला मिळाले किती तर फक्त ७०१ कोटी. मराठवाडा भागात पाण्यासाठी स्वतंत्र १४ हजार ४० कोटींची घोषणा केली होती मिळाले फक्त ६१ कोटी असे वडेट्टीवार म्हणाले.
आता मराठवाडयातील जनतेने हिशोब करुन अंदाज घ्यावा की या महायुती सरकारने त्यांना किती कोटीने फसविले? असा सवाल करत महाराष्ट्राला देखील किती चुना लावत आहेत असेही वडेट्टीवार म्हणाले.
“प्रसिद्धीसाठी महायुतीचा एकच मंत्र
घोषणा मोठ्या, काम कमी हेच तंत्र ”मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सव निमित्त गेल्यावर्षी महायुती सरकारने वाजत गाजत कॅबिनेट बैठक घेतली.. जोरदार पत्रकार परिषद घेऊन मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी ४५ हजार कोटींची घोषणा केली.
घोषणा होऊन एक… pic.twitter.com/BTc6UMbZfO
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 17, 2024